अधिक चांगले कोणते आहे, इंट्राडे की फ्युचर ट्रेड?

स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा प्रश्न येतो, तिथे ट्रेडर्ससाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. दोन लोकप्रिय निवडी आहेत, इंट्राडे आणि फ्युचर्स ट्रेडिंग. दोन्ही प्रकारच्या ट्रेडिंगचे फायदे आणि नुकसान आहेत, त्यामुळे अचूक पर्याय निवडण्यासाठी काही वेळ लागतो. इंट्राडे आणि फ्युचर ट्रेडिंग स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ट्रेडर्ससाठी लोकप्रिय पर्याय आहेत. हे ब्लॉग पोस्ट ट्रेडर्सना त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे उत्तम आहे, हे ठरविण्यास मदत करण्यासाठी इंट्राडे आणि फ्युचर्स ट्रेडिंगचे फायदे आणि नुकसान यांची तुलना आणि फरक करेल.

इंट्राडे म्हणजे काय?

इंट्राडे, ज्याला डे ट्रेडिंग असे देखील म्हणतात, ते अशा प्रकारचे ट्रेडिंग आहे, ज्यात पोजिशन्स एकाच दिवसात खरेदी आणि विक्री केले जातात. याचा अर्थ, ट्रेडिंगच्या दिवस अखेरीस सर्व पोजिशन्स बंद केले जातात, आणि दुसऱ्या दिवसासाठी जोखीम घेतली जात नाही. इंट्राडे ट्रेडर्स मार्केटच्या अल्पमुदतीच्या किमतींच्या बदलांमधून पैसे कमाविण्याचा प्रयत्न करतात. ते ट्रेडिंगचे पटकन निर्णय घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषणासाठी विभिन्न साधने वापरतात. डे ट्रेडर्स आणि मार्केटच्या वरच्यावर होणाऱ्या आणि काहीशा  जलद अस्थिरतेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी  ही एक सामान्य रणनीती आहे.

फ्युचर ट्रेडिंग काय आहे?

फ्युचर ट्रेडिंग, ज्याला "फ्युचर्स ट्रेडिंग" असे देखील म्हणतात, हा एखादी वस्तू किंवा आर्थिक साधनांच्या किमती कशा रीतीने भविष्यात बदलतील यावर सट्टा लावण्याचा एक मार्ग आहे. कॉन्ट्रैक्टावर स्वाक्षऱ्या होतात तेव्हा असेटची किंमत निर्धारित केली जाते, पण त्या असेटची देवाणघेवाण नंतरच होते. फ्युचर ट्रेडर्स कमी किमतीवर खरेदी करून आणि जास्त किमतीवर विकून, समाविष्ट असेटच्या किमतीतील चढउतारापासून फायदा मिळविण्याचे ध्येय राखतात. अशा प्रकारचे ट्रेडिंग सहसा किमतींमधील बदल आणि अटकळींपासून संरक्षणासाठी आणि ठराविक मार्केट्समधून याचा लाभ मिळविण्यासाठी वापरले जाते.

इंट्राडे ट्रेडचे फायदे

इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
  • पटकन फायदे मिळविण्याची क्षमता
इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडर्सना मार्केटमधील किमतींच्या अल्पमुदतीत उतारचढावांचा फायदा घेत, एकाच दिवसात पोजिशन्समध्ये प्रवेश करण्यास आणि बाहेर पडण्यास  अनुमती देते. यामुळे ट्रेडर्सना पटकन पैसे मिळविण्यास मदत होऊ शकते, कारण ते दिवसभरात घडणाऱ्या किमतींमधील लहान बदलांचा फायदा घेऊ शकतात. इंट्राडे ट्रेडर्स शॉर्ट-टर्म  किमतींचे बदल शोधण्यासाठी इतर तांत्रिक विश्लेषण साधनांसोबत चार्ट पॅटर्न्स आणि इंडिकेटर्स वापरतात.
  • जोखीम कमी असते
ट्रेडिंगच्या दिवस अखेरीस पोजिशन्स बंद होणे इंट्राडे ट्रेडिंगचे वैशिष्ट्य असते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशीची जोखीम रहात नाही. याचा अर्थ ट्रेडिंगच्या वेळेच्या बाहेर किमतींमधील उतारचढावांचा ट्रेडर्सवर कोणताही परिणाम होत नाही. यामुळे फ्युचर्ससारख्या ट्रेडिंगच्या इतर प्रकारांपेक्षा इंट्राडे तुलनेने कमी जोखमी ठरते.
  • ट्रेडिंग तासांच्या स्वरुपात लवचिकता
इंट्राडे ट्रेडर्स मार्केटच्या कोणत्याही वेळेत ट्रेडिंग करू शकतात, ज्यामुळे इतर वचनबद्धता असलेल्या किंवा ठराविक तासांमध्येच ट्रेड करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक सोयीस्कर पर्याय बनतो. यामुळे ट्रेडर्स त्यांच्या वेळापत्रकानुसार ट्रेडिंगची योजना करू शकतात आणि तसेच, ते ट्रेडिंगसाठी उपलब्ध असणाऱ्या किमतींमध्ये होणाऱ्या बदलांचा फायदा देखील घेऊ शकतात.
  • शॉर्ट-टर्मच्या ट्रेडर्ससाठी योग्य
इंट्राडे ट्रेडिंग पटकन नफा मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी चपखल आणि आणि मार्केटच्या जलद गतीच्या स्वरूपामुळे सोयीस्कर आहे. अधिक काळासाठी पोजिशन्स राखून ठेवू इच्छित नाहीत आणि मार्केटच्या अत्यल्प मुदतीतील उतारचढावांचा फायदा घेऊ  इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. ट्रेडिंगचे शॉर्ट-टर्मचे स्वरूप देखील काही ट्रेडर्ससाठी अधिक सोपे बनवते.

इंट्राडे ट्रेडिंगचे तोटे

इंट्राडे ट्रेडिंग, ज्याला "डे ट्रेडिंग" देखील म्हणतात, एकाच दिवसात आर्थिक साधनांची खरेदी आणि विक्री असते. परंतु, यात काही तोटे देखील आहेत, जे ट्रेडर्सनी अशा प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये गुंतण्यापूर्वी लक्षात घेतले पाहिजेत. खाली काही तोटे दिले आहेत:
  • मार्केटवर निरंतर लक्ष ठेवण्याची गरज असते
इंट्राडे करणाऱ्या ट्रेडर्सनी ट्रेडिंगचे पटकन निर्णय घेण्यासाठी मार्केटवर नजर ठेवणे आवश्यक असते. यासाठी फार वेळ लागू शकतो आणि यासाठी ट्रेडरने सतर्क राहण्याची आणि नेहमी  लक्ष केंद्रित ठेवण्याची गरज पडू शकते. इंट्राडे ट्रेडिंगचे जलद गतीचे स्वरूप म्हणजे ट्रेडर्सनी मार्केटच्या हालचालींच्या प्रतिसादात पटकन कृती करण्यासाठी सक्षम राहिले  पाहिजे, आणि काही ट्रेडर्ससाठी हे आव्हानात्मक ठरू शकते.
  • तणावजन्य राहू शकते
इंट्राडे ट्रेडिंगचे जलद गतीचे स्वरूप काही ट्रेडर्ससाठी तणावजन्य ठरू शकते, खास करून यात सामील असलेली जोखमीच्या पातळी त्यांच्यासाठी सोयीस्कर नसल्यास. ट्रेडिंगचे शॉर्ट-टर्मचे स्वरूप मार्केटच्या उतारचढावांचा अंदाज करण्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते, ज्यामुळे तणाव वाढू शकतो.
  • अधिक शिस्त आणि लक्ष केंद्रित ठेवणे गरजेचे असते
इंट्राडे ट्रेडर्सनी शिस्तबद्ध राहिले पाहिजे आणि फायदेशीर ट्रेडिंग करण्यासाठी लक्ष केंद्रित ठेवले पाहिजे. त्यांनी पटकन पाऊल उचलले पाहिजे आणि निरंतर बदलणाऱ्या मार्केटच्या माहितीच्या आधारावर निर्णय घेतले पाहिजेत. हे काही ट्रेडर्ससाठी कठीण होऊ शकते, ज्यांना अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि शिस्तबद्ध राहण्याची गरज असेल. तसेच, मार्केटवर निरंतर नजर ठेवण्याच्या आणि पटकन निर्णय घेण्याच्या तणावामुळे  भावनात्मक आणि  आवेगपूर्ण ट्रेडिंग केले जाऊ शकते, ज्यामुळे नुकसान होऊ शकते.

फ्युचर ट्रेडिंगचे फायदे

फ्युचर्स ट्रेडिंग हा एक डेरिवेटिव्हचा एक प्रकार आहे, जो गुंतवणूकदारांना अंडरलाईंग असेटच्या भविष्यातील किमतीवर किंवा अंडरलाईंग असेटमध्ये त्यांच्या जोख्मीस सुरक्षित करू देतो. फ्युचर्स ट्रेडिंग करण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की:
  • खरेदी लॉक करणे
फ्युचर्स ट्रेडिंग ट्रेडर्सना किमतींमधील बदलांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी भविष्यातील एका निर्धारित तारखेवर असेट खरेदी करू किंवा विकू देते. हे अंडरलाईंग असेटच्या किमतींमधील संभाव्य उतारचढावांना सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाऊ शकते. उदा., भविष्यातील मक्याच्या किमतीबद्दल चिंतीत असणारा एखादा शेतकरी भविष्यातील एखाद्या विशिष्ट किमतीवर मका विकण्यासाठी फ्युचर्स कॉन्ट्रैक्टावर स्वाक्षरी करू शकतो. यामुळे मक्याच्या किमतीतील संभाव्य घसरणीपासून शेतकऱ्याचे संरक्षण होते. जोखीम हाताळण्यासाठी के एक उपयुक्त साधन आहे आणि ते ट्रेडर्सची त्यांच्या पोर्टफोलिओवरील किमतींमधील खराब बदलांचा परिणाम कमी करण्यास मदत करू शकते.
  • शॉर्ट-टर्मच्या आणि लॉन्ग-टर्मच्या ट्रेडिंगसाठी वापरले जाऊ शकते
फ्युचर ट्रेडिंग शॉर्ट-टर्मच्या अंदाजासाठी आणि लॉन्ग-टर्मच्या गुंतवणुकीसाठी वापरले जाऊ शकते. ट्रेडर्स एका ठराविक कालावधीसाठी फ्युचर्स कॉन्ट्रैक्ट करू शकतात, जसे की काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी देखील. यामुळे, गुंतवणुकीची वेगवेगळी ध्येये आणि वेळेची चौकट असणारे ट्रेडर्स या मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात.
  • अधिक लिक्विडीटी
फ्युचर मार्केटमध्ये सहसा कॅश मार्केटच्या तुलनेत अधिक लिक्विडीटी असते, ज्यामुळे अधिक कार्यक्षम ट्रेडिंग होते. याचे कारण म्हणजे, फ्युचर्स कॉन्ट्रैक्ट प्रमाणित असतात आणि नियोजित एक्स्चेंजीसवर त्यांचे ट्रेडिंग होते, ज्यामुळे ट्रेडर्ससाठी पोजिशन्समध्ये पटकन प्रवेश करणे आणि बाहेर पडणे अधिक सोपे होते. अधिक लिक्विडीटी मुळे देखील बिड-आस्क स्प्रेड्स अधिक काटेकोर होऊ शकतात आणि व्यवहाराचा खर्च कमी होऊ शकतो, ज्याचा ट्रेडर्सना फायदा होऊ शकतो.
  • प्रतिपूरक संधी
फ्युचर ट्रेडर्स प्रतिपुरकाचा वापर त्यांचे संभाव्य परतावे वाढवण्यासाठी करू शकतात. प्रतिपुरकासह, ट्रेडर्स त्यांच्या स्वतःच्या पैशाने घेऊ शकत असल्यापेक्षा अधिक मजबूत स्थिती साध्य करू शकतात, ज्यामुळे अधिक संभाव्य परतावे मिळू शकतात. तथापि, यात ट्रेडरने गुंतवलेल्या रकमेपेक्षा अधिक गमावण्याची जोखीम देखील वाढते. ट्रेडर्सनी या वाढीव जोखमीबद्दल जागरूक राहिले पाहिजे आणि प्रतिपुरकाचा वापर त्यांच्यासाठी सोयीस्कर असला तरच केला पाहिजे.

फ्युचर ट्रेडचे तोटे

या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये गुंतण्यापूर्वी ट्रेडर्सनी जागरूक राहिले पाहिजे असे काही तोटे आहेत:
  • अधिक जोखीम सामील असते
फ्युचर ट्रेडिंगमध्ये अधिक जोखीम सामील असते, कारण ट्रेडर्सना दुसऱ्या दिवसाच्या किमतीच्या उतारचढावांचा आणि मार्केटमधील संभाव्य तफावतींचा सामना करावा लागतो. फ्युचर्स कॉन्ट्रैक्ट अंदाज करण्यासाठी देखील अधिक कठीण असतात, कारण ते मोठ्या विस्तारित कालावधीसाठी असतात. यामुळे ट्रेडर्सनी गुंतवलेल्या रकमेपेक्षा अधिक गमावण्याची अधिक शक्यता असते. फ्युचर ट्रेडिंगमध्ये प्रतिपुरकाचा वापर जोखीम वाढवू शकतो आणि हाताळण्यास कठीण बनवू शकतो.
  • अधिक लक्षणीय गुंतवणुकीची गरज असते
फ्युचर ट्रेडर्समध्ये एखाद्या पोजिशनमध्ये प्रवेश करताना अधिक लक्षणीय गुंतवणुकीची गरज असते. याचे कारण म्हणजे, फ्युचर कॉन्ट्रैक्ट सहसा अधिक खर्चिक असतात आणि कॅश मार्केट साधनांपेक्षा उच्च मार्जिनची आवश्यकता असते. यामुळे लहान आकाराचे खाते असलेल्या ट्रेडर्ससाठी हे कमी अनुकूल बनते.
  • अनियोजित घटनांचा परिणाम होऊ शकतो
फ्युचर ट्रेडर्सना नैसर्गिक आपत्ती किंवा सरकारी धोरणांमधील बदल यांच्यासारख्या अनियोजित घटनांच्या जोखमीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे अंडरलाईंग असेटमध्ये किमतींमध्ये मोठे बदल घडू शकतात. यामुळे ट्रेडर्ससाठी मार्केटच्या उतारचढावांचा अंदाज करणे अधिक आव्हानास्पद होऊ शकते आणि परिणामी नुकसान होऊ शकते. या घटना मार्केट विस्कळीत देखील करू शकतात आणि पोजिशनमधून बाहेर पडणे कठीण बनवू शकतात. ट्रेडर्सनी बातम्या आणि घटनांवर एक नजर ठेवणे जरूर असते, जे ते ट्रेडिंग करत असलेल्या अंडरलाईंग असेटवर परिणाम करू शकतात.
  • इंट्राडे आणि फ्युचर ट्रेडिंगचा उपयोग काय आहे?
इंट्राडे ट्रेडिंग मार्केटमधील शॉर्ट-टर्मच्या किमतीच्या उतारचढावांचा फायदा घेण्यासाठी वापरला जातो. इंट्राडे ट्रेडर्स एकाच दिवसात पोजिशनमध्ये प्रवेश करतात आणि बाहेर पडतात. किमतींमधील बदल शोधण्यासाठी आणि फायदा मिळवण्यासाठी ते  तांत्रिक विश्लेषणासाठी वेगवेगळे साधने वापरतात. ट्रेडिंगच्या दिवसभरात किमतींमधील लहान बदलांचा फायदा घेऊन पटकन नफा मिळवणे हे ध्येय असते. तर दुसऱ्या बाजूस, फ्युचर ट्रेडिंग हे किमतींच्या उतारचढावांच्या समोर सुरक्षिततेसाठी, भविष्यातील किमतींच्या उतारचढावांच्या अंदाजासाठी आणि प्रतिपुरकासह विशिष्ट मार्केट्समध्ये  प्रवेशासाठी वापरले जाते. फ्युचर ट्रेडर्स भविष्यात ठराविक तारखेस एखादी विशिष्ट असेट खरेदी किंवा विक्री करण्यासाठी कॉन्ट्रैक्ट करतात. कॉन्ट्रैक्टावर स्वाक्षरी केली जाते, तेव्हा असेटची किंमत निर्धारित होते, पण त्या असेटची देवाणघेवाण केवळ नंतर होते. अशा प्रकारचे ट्रेडिंग सामान्यपणे हेजर्स, स्पेक्युलेटर्स आणि आपल्या गुंतवणुकीवर लाभ मिळवू इच्छिणारे वापरतात.

अधिक चांगले कोणते आहे, इंट्राडे की फ्युचर ट्रेड?

एखाद्या ट्रेडरसाठी इंट्राडे चांगले आहे किंवा फ्युचर्स ट्रेडिंग चांगले आहे, हे त्याची ट्रेडिंगची शैली, अनुभव आणि आर्थिक क्षमता यांच्यावर अवलंबून असते. इंट्राडे अशा ट्रेडर्ससाठी चांगले आहे ज्यांना पटकन पैसे मिळवायचे आहेत आणि मार्केटच्या जलद गतीशी परिचित आहेत. हे पटकन फायदा मिळविण्यास सक्षम बनवते, यात कमी जोखीम असते, ट्रेडिंगच्या तासांमध्ये लवचिकता असते आणि शॉर्ट-टर्मच्या ट्रेडर्ससाठी योग्य असते. तथापि, यात मार्केटवर निरंतर लक्ष ठेवण्याची गरज असते, जे तणावजन्य असू शकते आणि उच्च दर्जाची शिस्त आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. फ्युचर्स ट्रेडिंगमुळे लिक्विडीटी सह अधिक लवचिकता, प्रतिपूरक संधी आणि किमतींच्या उतारचढावांपासून संरक्षण मिळते आणि ते अल्प-मुदत आणि दीर्घ-मुदत या दोघांसाठी. परंतु , यात देखील अधिक जोखीम असते, ज्यात लक्षणीय आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता असते आणि त्याच्यावर देखील अनपेक्षित घटनांचा परिणाम होऊ शकतो शेवटी, ट्रेडर्सनी त्यांची ट्रेडिंगची शैली, अनुभव आणि आर्थिक क्षमता यांच्यानुसार ट्रेडिंगचा प्रकार निवडला पाहिजे. त्यांनी त्यांच्यासाठी ट्रेडिंगचा कोणता प्रकार अधिक चांगला आहे हे ठरविण्यापूर्वी त्यांची जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीच्या ध्येयांचा देखील विचार केला पाहिजे.

निष्कर्ष

इंट्राडे आणि फ्युचर्स ट्रेडिंग या दोन्हींचे आपापले फायदे आणि तोटे आहेत. इंट्राडे अशा ट्रेडर्ससाठी चांगले आहे ज्यांना पटकन पैसे मिळवायचे आहेत आणि मार्केटच्या जलद गतीशी परिचित आहेत. हे पटकन फायदा मिळविण्यास सक्षम बनवते, यात कमी जोखीम असते, ट्रेडिंगच्या तासांमध्ये लवचिकता असते आणि शॉर्ट-टर्मच्या ट्रेडर्ससाठी योग्य असते. तथापि, यात मार्केटवर निरंतर लक्ष ठेवण्याची गरज असते, जे तणावजन्य असू शकते आणि उच्च दर्जाची शिस्त आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. तर दुसऱ्या बाजूस, फ्युचर ट्रेडिंगमुळे किमतींच्या उतारचढावांसमोर संरक्षण मिळते, जे शॉर्ट-टर्मच्या आणि लॉन्ग-टर्मच्या ट्रेडिंगसाठी, अधिक लिक्विडीटी साठी आणि प्रतिपूरक संधींसाठी वापरले जाऊ शकते. पण यात अधिक जोखीम असते. यात अधिक लक्षणीय गुंतवणुकीची गरज असते, आणि यावर अशा गोष्टींचा परिणाम होऊ शकतो, ज्यांच्यासाठी तुम्ही योजना बनवून ठेवू शकत नाही. ट्रेडिंगचा विशिष्ट प्रकार निवडण्यापूर्वी ट्रेडर्सनी त्यांच्या वैयक्तिक गरजा आणि प्राधान्ये यांचे काळजीपूर्वक मुल्यांकन करणे गरजेचे असते. ट्रेडिंगची शैली, अनुभवाची पातळी, आर्थिक संसाधने, जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. अशी ट्रेडिंग रणनीती निवडणे महत्त्वाचे असते, जे तुमच्या एकंदर गुंतवणुकीच्या ध्येयांशी आणि जोखीम हाताळण्याच्या रणनीतीशी जुळेल. अखेरीस, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की ट्रेडिंग एक अत्यंत गतिशील आणि प्रवाही प्रक्रिया आहे, आणि ट्रेडर्सनी सतत लक्ष ठेवले पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या रणनीती बनवल्या पाहिजे. तुम्ही इंट्राडे पसंत करा किंवा फ्युचर्स ट्रेडिंग, मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वकाही या ॲपमध्ये सामील आहे. मग वाट कशाची पहायची? स्मार्ट पणे सॅम्को ॲपसह आजच ट्रेडिंगला सुरुवात करा! आणि तुम्ही हे करत असताना, सॅम्को सह डिमॅट खाते उघडण्यास विसरू नका. डिमॅट खाते उघडणे अतिशय सोपे आहे आणि यात कमी ब्रोकरेज (दलाली), ट्रेडिंग ॲपसह सहजपणे मिसळून जाणे आणि बरेच काही अश्या अनेक फायद्यांचा समावेश आहे. सॅम्कोसह डिमॅट खाते आजच उघडण्यासाठी येथे क्लिक करा आणि यशस्वी ट्रेडिंगच्या दिशेत पहिले पाऊल उचला!
Samco Fast Trading App

Download App to get free trading ideas

Get the link to download the app.

Leave A Comment?